धुळे : दगडफेक करून भाविकांना लुटले; दरोडेखोर २४ तासात पोलिसांच्‍या ताब्‍यात

धुळे : उज्जैन येथून देवदर्शन करून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांच्‍या कारवर दगडफेक करून लुटले होते. भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुद्देमालासह मूसक्या आवळल्या आहेत.

उज्जैन येथून देवदर्शन करून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांनी वाहन आराम करण्यासाठी धुळे तालुक्यातील आर्वी या परिसरामध्ये मुंबई– आग्रा महामार्गावर थांबवले होते. पहाटेच्या दरम्यान काही दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा उचलत या भाविकांच्या वाहनावर दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळील ऐवज घेऊन त्यांना मारहाण करून पोबारा केल्याची घटना पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली होती. या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता या दरोडेखोरांच्या मूसक्या 24 तासाच्या आत आवळण्यात यश आले आहे. त्या चोरट्यांकडून त्यांनी लुटलेला मुद्देमाल त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेले हत्यार व या दरोड्यात वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. या दरोडेखोरांपैकी तीन दरोडेखोरांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या असून, हे तिघेही दरोडेखोर नांदेड येथील असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे देखील उघडकीस आले आहे. फरार आरोपींचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह तालुका पोलीस करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply