“देशाने गंगेत तरंगणारी प्रेतंही बघितली अन् दुसरीकडे मुंबई महापालिकेने जनेतेचे जीव वाचवण्यासाठी केलेल प्रयत्न बघितले”; ‘कॅग’ चौकशीवरून भास्कर जाधवांची शिंदे सरकारवर टीका

करोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कॅग चौकशीच्या निर्णयावर आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही प्रतिक्रिया दिली. भडकाऊ भाषण दिल्याप्रकारणी आज भास्कर जाधव यांनी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावली होती. या चौकशीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“करोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कामाच ऑडिट झाल तर फार बर होईल. कारण मुंबईत करोना काळात जे काम झालं, त्याचा भाजपाला विसर पडला असला, या कामांचा त्यांना तीरस्कार वाटत असला, तरी जागतिक आरोग्य संघटनेना तसेच सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या कामाची दखल घेऊन कौतुक केले आहे. तसेच इच्छा नसतानाही केंद्र सरकारनेदेखील कौतुक केले आहे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कौतुक केले आहे, त्यामुळे कितीही चौकशी झाली, तरी फरक पडत नाही”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.

“करोना काळात सुरूवातीला आपल्याकडे फक्त दोन टेस्टींग लॅब होत्या. मात्र उद्धव ठाकरे ,यांच्या सरकारने त्या सहा हजारापर्यंत वाढवल्या. त्यावेळी आपल्याकडे ८५ हजार ते एक लाख बेड होते, ते बेड सरकारने साडेआठ लाखापर्यंत वाढवले. याचा अर्थ भाजपाकडून केलेले काम लपवायचा प्रयत्न होत आहे. करोना काळात एकीकडे देशाने गंगेत तरंगणारी प्रेतं बघितली. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने जनेतेचे जीव वाचवण्यासाठी केलेल प्रयत्न बघितले”, असेही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही खोचक टीका केली. “कोकणात उद्योग आणण्यासाठी लघु, मध्यम आणि सूक्ष्म केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बरोबर चर्चा करण्याएवढा मी मोठा नाही. ते खूप मोठे आहेत आणि त्यांच्या बरोबर चर्चा करायची म्हटलं तर ते माझ्या सारख्या छोट्या व्यक्ती बरोबर चर्चा करू शकणार नाहीत”, असे ते म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply