नवी दिल्ली, : जगासमोर कोरोना महारोगराईच्या चौथ्या लाटेचे महासंकट उभे आहे. अमेरिका, ब्राजील, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रूस, इटली, फ्रांन्स, जापान,थायलंड, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रिया मध्ये चौथ्या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. अशात भारतातील कोरोनाबाधितांची संख्या देखील चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशातील २९ जिल्ह्यांमध्ये कोरोनास्थिती हाताबाहेर गेली आहे. या जिल्ह्यांचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक नोंदवण्यात आला आहे. देशात गेल्या २८ दिवसांमध्ये ५ हजार ४७४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर, ४० हजार ८६६ कोरोनाबाधित आढळले. दिलासादायक बाब म्हणजे या चार आठवड्यांमध्ये ५८ हजार १५८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे.
केरळमधील १४ जिल्ह्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक दैनंदिन कोरोनासंसर्गदर नोंदवण्यात आला आहे. १०० पैकी १० लोक संसर्गग्रस्त आढळत असल्याने, चिंता व्यक्त केली जात आहे. मिझोरम मधील सात जिल्ह्यांचा संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक, तर तीन जिल्ह्यांचा ५ ते १० टक्क्यांदरम्यान नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गुरूग्रामचा संसर्गदर ५.८१ टक्के आहे. मणिपुर आणि ओडिशातील प्रत्येकी एक जिल्ह्याचा कोरोनासंसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्याचा संसर्गदर १२.५% आहे.
मंगळवारी ११ एप्रिल रोजी देशात ७९६ कोरोनाबाधित आढळले होते. पंरतु, गुजरात, दिल्ली आणि हरियाणाच्या कोरोनारुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत गुजरात मध्ये ४२.४ टक्के, दिल्ली ३४.९ टक्के आणि हरियाणात १८.१ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
२२ ते २८ मार्च दरम्यान सर्वाधिक कोरोनामृत्यू
गत महिन्यात १५ ते २१ मार्च पर्यंत देशात ४७१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. पंरतु, यानंतर एका आठवड्यात २२ ते २८ मार्च दरम्यान कोरोनाने ४ हजार ४६५ रुग्णांचा बळी घेतला. २५ मार्चला सर्वाधिक ४ हजार १०० मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सर्वाधिक ४ हजार ७ मृत्यू महाराष्ट्र, तर ८१ मृत्यू केरळमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. जुन्या मृत्यूची नोंद घेण्यात आल्याने हा आकडा वाढल्याचे दिसून आले आहे. २९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान ३१५, तर ५ ते ११ एप्रिल दरम्यान २२३ कोरोनामृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


