दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – अजित पवार

सोमेश्वरनगर - ‘नाही म्हटले तरी राज्यकारभार तुम्हीच चालवताय. मुख्यमंत्री कधीमधीच दिसतात. तुम्ही नेहमी उपलब्ध होणारे, भेटणारे आहात; म्हणून सांगतो दूध भेसळखोरांवर (Milk Mixing) कडक कारवाई (Crime) करा,’ अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढत अजित पवार यांचे कौतुक केले. यावर अजित पवार यांनीही बालकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांबाबत टोकाची भूमिका घेतली जाणार असल्याचे सांगत शेट्टी यांच्या विधानास प्रतिसाद दिला.

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी रविवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शेट्टी आणि पवार एकाच व्यासपीठावर होते. या वेळी दोघांनीही एफआरपीबाबत चकार शब्द काढला नाही. उलट पवार यांनी लोकशाहीत राजकीय मतभेद असू शकतात. संविधानाने प्रत्येकास विचारस्वातंत्र्य दिले असल्याचे सांगत शेट्टींच्या मतभेदांबाबत आपली भूमिका मांडली.

गेल्या काही दिवसांत समाज माध्यमात बिबट सफारी ‘बारामती’ला पळविली अशी चर्चा सुरू असल्याबाबत पवार म्हणाले, ‘बिबट सफारी जुन्नरलाही होईल आणि बारामतीलाही होईल.’



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *