…तर मी हे पाप केलंय; भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत मोदींचे वक्तव्य

नवी दिल्ली : खासदारांच्या मुलांना तिकीट न देणे पाप असेल तर, मी हे पाप केले आहे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत केले आहे, तसेच पक्षात घराणेशाही चालणार नसून, घराणेशाहीच्या राजकारणासाठी इतर पक्ष असल्याचे मोदींनी पक्षातील खासदारांना दिली आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. मोदी म्हणाले की, जर कोणाचे तिकीट कापले असेल, तर त्याची जबाबदारी माझी आहे. यावेळी मोदींनी सर्व खासदारांना निवडणुकीत भाजपच्या काही जागांवर मिळालेल्या पराभवाचे मूल्यांकन करण्यासही सांगितले आहे. तुमच्या भागातील गमावलेल्या 100 बूथचे मूल्यांकन करण्यास तसेच का हरलो याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना मोदींनी बैठकीमध्ये सर्व खासदारांना दिल्या आहेत. यामुळे पराभवाची कारणे शोधता येतील आणि त्यात सुधारणा करणे सोपे होईल. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याबाबतही चर्चा केली. तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाइल्स या चित्रपटाबाबतही त्यांनी काश्मीरचे सत्य दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. निवडणुकीत भाजपचा शानदार विजय उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. यूपीमध्ये इतिहास रचताना भाजपने पुन्हा एकदा विजय मिळवला. यूपीमध्ये भाजप आघाडीला 273 जागा मिळाल्या आहेत. तर सपा आघाडीला 125 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 2 तर बसपाला 1 जागा मिळाल्या. उत्तराखंडमध्ये भाजपने 47 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला 19 जागांवर समाधान मानावे लागले. गोव्यात भाजप बहुमतापासून एक जागा दूर राहिला आहे. मात्र मित्रपक्षांच्या मदतीने तेथे सरकार स्थापन करण्यात येणार आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply