टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

उद्योग क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झाले आहे. मंगळवारी (२९ नोव्हेंबर) रात्री ही दु:खद घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम किर्लोस्कर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

विक्रम किर्लोस्कर हे टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जातं. आपल्या कार्यकुशल नेतृत्वाने त्यांनी टोयोटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.

विक्रम किर्लोस्कर हे 64 वर्षांचे होते. आज दुपारी 1 वाजता बंगळुरुमधील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय विक्रम किर्लोस्कर यांना जातं. विक्रम किर्लोस्कर हे MIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर होते. त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply