झारखंडमधील मनी लाँड्रिंग प्रकरणी IAS अधिकारी पूजा सिंघल यांना अटक

रांची: झारखंडमध्ये कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ने IAS अधिकारी पूजा सिंघल यांना अटक केली आहे. झारखंडच्या mining secretary असलेल्या पूजा सिंघल मनरेगा निधीच्या कथित गैरव्यवहार आणि इतर आरोपांशी संबंधित मनी-लाँडरिंग चौकशीसाठी रांची येथे ईडीसमोर हजर झाल्या आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) झारखंडच्या मायनिंग सेक्रेटरी पूजा सिंघल यांना मनरेगा निधीच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. काल सिंघल यांची जवळपास 9 तास चौकशी करण्यात आली होती.

पूजा सिंघल आज पुन्हा एकदा ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंग प्रकरणात 2000 सालच्या बॅचच्या IAS अधिकारी पूजा सिंघल यांचा जबाब नोंदवला. अंमलबजावणी संचालनालयाने आता त्याला अटक केली आहे. पूजा सिंघल याआधीही या प्रकरणामुळे चर्चेत आल्या होत्या. प्रथम त्या तरुण वयात आयएएस बनून प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, मात्र या प्रकरणांची कधीच गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. आयएएस अधिकाऱ्याशी लग्न करून घटस्फोटानंतर एका व्यावसायिकाशी लग्न केल्यामुळेही त्या चर्चेत आल्या होत्या. पूजा सिंघल यांची बेधडक प्रशासकीय अधिकारी म्हणून ओखळ राहिली आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply