जळगाव : उपोषणदरम्‍यान महिलेचा मृत्यू; चाळीस दिवसांपासून सुरू होते उपोषण

जालना : जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील चाळीस दिवसांपासून उपोषणाला बसलेल्‍या माजी सैनिकाच्या वृद्ध पत्नीचा मृत्यु झाला. यामुळे जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.

स्तुराबाई बळवंत गायकवाड असे वृद्ध मृत्यु पावलेल्या माजी सैनिकांच्या पत्नीचे नाव आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि प्राचार्या यांनी शासनाकडून माजी सैनिकास मिळालेल्या जागेवर अतिक्रमण केले आहे. जालना- औरंगाबाद महामार्गावरील सर्वे नंबर 49/38 या जमिनीचा वाद सुरू आहे. वादामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य यांना वाद असलेल्या जमिनीवर जाण्यास कोर्टाने मनाई केली असतानाही प्राचार्य आपल्या दोन शिक्षकांसह वाद असलेल्या जमिनीवर येऊन त्यांनी गायकवाड यांच्या सुनेसह नातीस छेडछाड करून शिविगाळ केली केला असल्याचा आरोप माजी सैनिकांच्या कुटूंबानी करत कारवाईच्या मागणीसाठी गायकवाड कुटूंबाकडून उपोषण सुरू होते.

प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाच्या दरम्यान कस्‍तुराबाई गायकवाड या महिलेचा आज मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून महिलेल्‍या कुटुंबातील सदस्यांकडून प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply