जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लात चकमक; जिगरबाज जवानांनी ५ दहशतवाद्यांना टिपलं

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात भारतीय सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. नुकत्याच झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यातील दोन लश्कर-ए-तोयबाचे दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यात 'लश्कर'चा कमांडर युसूफ कांतरू याचाही समावेश आहे.

तत्पूर्वी, बारामुला चकमकीत 'लश्कर'चा टॉप कमांडर युसूफ कांतरू मारला गेला आहे, असे सांगण्यात आले. तो अलीकडेच बडगाम जिल्ह्यात जम्मू-काश्मीर पोलीस विभागातील एसपीओ आणि त्यांचा भाऊ, एक जवान आणि एका नागरिकाच्या हत्येसह इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात सामील होता, अशीही माहिती समोर आली होती.

याआधी जम्मू- काश्मीर पोलिसांनी ट्विट करून चकमकीबाबत माहिती दिली होती. ही चकमक मालवा परिसरात सुरू होती. या चकमकीत सुरुवातीला तीन जवान जखमी झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांनाही लक्ष्य केले जात असल्याचे दिसून आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply