‘जगभरातून भारतावर दबाव; तरीही निर्णयावर ठाम, परराष्ट्रमंत्री जयशंकर हे…’

रशियासोबतच्या व्यापाराबाबत जगभरातून भारतावर दबाव आहे. तरीही भारत आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यानुसार आपले परराष्ट्र धोरण बनवत आहे. ही मोठी गोष्ट आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता स्वत:चे परराष्ट्र धोरण ठरवले. हे कौतुकास्पद आहे. एस जयशंकर हे भारताचे खरे देशभक्त आहेत, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव म्हणाले. 

भारताचा विकास आणि सुरक्षितता यावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या देशासाठी निर्णय घेत आहोत. इतके स्पष्ट बोलण्याचे धाडस फारच कमी देशांमध्ये आहे. अन्न सुरक्षा, संरक्षण आणि काही धोरणात्मक क्षेत्रांसाठी रशिया पाश्चात्त्य देशांवर अवलंबून राहू शकत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियावर लादलेल्या अनैतिक निर्बंधांची पर्वा न करणाऱ्या सर्व देशांना आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. भारत हा त्यापैकी एक आहे, असेही सर्गेई लावरोव म्हणाले.

रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करणाऱ्या भारताने रशियाला वैद्यकीय उपकरणे देण्याचे मान्य केले आहे. पाश्चात्त्य देशांनी रशियावर अनेक आर्थिक आणि व्यापारी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियामध्ये वैद्यकीय उपकरणांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत रशिया पुन्हा एकदा भारताकडे मदतीच्या आशेने पाहत आहे. भारतही रशियाला मदत करण्यास तयार आहे.

दोन्ही देशांमध्‍ये देवाणघेवाण करण्‍याच्‍या माध्‍यमावर म्‍हणजे कोणत्‍या चलनात व्‍यापार होईल याविषयी चर्चा सुरू आहे. शीतयुद्धाप्रमाणेच दोन्ही देश स्थानिक चलनात व्यापार करतील, असे बोलले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply