छगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप; सरस्वती वक्तव्याशी आहे संबंध

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह दोघांविरोधात कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सरस्वती पूजनाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता.

चेंबूरमध्ये राहणारे व्यावसायिक ललितचंद टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर छगन भुजबळ आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन आणि मेसेजद्वारे धमकावल्याचा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे. मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असे तक्रारदराने पोलिसांनी सांगितले आहे.

छगन भुजबळांचा त्या वादग्रस्त वक्तव्याचे दोन व्हिडिओ शेअर केल्यामुळे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असेही तक्रारदार टेकचंदानी यांनी तक्रारीत सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला असं विधान केलं. मात्र यावेळी त्यांनी हिंदू देवींच्या फोटोंचा उल्लेख केला. “शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?” असं विधान छगन भुजबळ यांनी केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply