चिंचवड पोटनिवडणूक: काँग्रेस ‘एकला चलो’वर ठाम; निवडणूक बिनविरोध होण्याची आशा धूसर

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने एकला चलोचा नारा दिला असून चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत. आम्ही पक्षश्रेष्ठीना विनंती करणार असून चिंचवड विधानसभा लढवण्यावर आम्ही ठाम असल्याचे विधान शहराध्यक्ष कैलास कदम यांनी केले आहे. काँग्रेसच्या या भुमिकेमुळे भाजपाच्या बिनविरोध पोटनिवडणुकीच्या धोरणाला खीळ बसली आहे. भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले आहे. चिंचवड विधानसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. 

भाजपाचे सर्व नेते चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आग्रही आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकेतच भाजपाच्या बैठकीतनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे विधान केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती करणार आहोत असे म्हटले होते. परंतु, काँग्रेस मात्र पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहे. आजपासून चिंचवड विधानसभेतील इच्छुकांचे उमेदवारी अर्ज घेण्यास काँग्रेस चे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सुरुवात केली आहे.

चिंचवड विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. पक्षश्रेष्ठीची मुंबईत बैठक होणार असून तिथं माझी भूमिका मांडणार आहे. असे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी सर्व पक्षीय नेते तयारी करत आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस, आप आणि ठाकरे गट यांनी पोटनिवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात महाविकास आघाडी असल्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी देण्याची शक्यता देखील स्थानिक राजकीय वर्तुळात आहे. अस असताना आता काँग्रेस ने मात्र ऐकला चलो ची भूमिका घेतल्याने आघाडीत बिघाडी होऊ शकते. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply