चंद्रकांत पाटलांना शाई हल्ल्याची भीती; चेहऱ्याच्या संरक्षणासाठी फेसशिल्डचा वापर

Chandrakant Patil Today News : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाई फेकण्यात आली होती. त्यानंतर चंद्रकांतदादांनी शाई हल्ल्याचा धसकाच घेतल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे, आज पिंपरी चिंचवडच्या सांगवी येथील एका कार्यक्रमात चंद्रकांतदादांनी आपला चेहरा चक्क फेसशिल्डने कव्हर केल्याचं पाहायलं मिळालं. आपल्यावर पुन्हा शाई हल्ला झाल्यास त्यातून चेहऱ्यावर शाई पडू नये यासाठी चंंद्रकांत पाटील यांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. त्यांनी फेसशिल्ड घातल्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. 

महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर १० डिसेंबरला पिंपरी-चिंचवड शहरात शाई फेकून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील पवनाथाडी जत्रेच्या उद्घाटनासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात दाखल झाले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विकास लोले यांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आज पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तरी देखील आपल्यावर कुणी शाई फेकून हल्ला करू नये म्हणून चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात आपल्या चेहऱ्यावर फेस शील्ड परिधान केली होती. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply