ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 : ग्रामपंचायत निकालात भाजपची सरशी; राष्ट्रवादीनं खातं खाेललं

ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 : नंदुरबार जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील दोनशे ग्रामपंचायतींसाठी नुकतेच मतदान झाले. आज प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. सध्या तीन ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. तिन्ही ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे. 

कोरोना काळात कार्यकाळ संपलेल्या दुसऱ्या टप्प्यातील 206 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून रविवारी त्यासाठी मतदान झाले. आज मतमोजणीस प्रारंभ झाला. अक्कलकुवा, तळोदा, नवापूर आणि धडगाव अशा चार तालुक्यांपैकी 206 ग्रामपंचायतची निवडणूकीमध्ये याआधीच सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर 183 सदस्य आणि ८ सरपंच बिनविरोध झाले आहे. उर्वरित 200 ग्रामपंचायत मधील 1321 सरपंच उमेदवार व चार हजार पेक्षा अधिक सदस्य पदाच्या उमेदवारांचे निकाल आज जाहीर होणार आहे.

नवापूर तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी १५ टेबल ६ फेरीमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. त्यासाठी ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आपल्या गावातील गाव कारभारी कोण निवडून येतो हे बघण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये ही मोठा उत्साह दिसून येत आहे. मतमोजणीच्या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे.

आत्तापर्यंत हाती आलेले निकाल

तळोदा तालुक्यातील आमलाड ग्रामपंचायतीवर भाजपाने ताबा मिळवला आहे.

तळोदा तालुक्यातील प्रतापपुर ग्रामपंचायतवर भाजपाचा विजय.

तळोदा तालुक्यातील बोरद ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली.

नंदुरबार अपडेट

हाती आलेले ग्रामंपचायत निकाल - 04

भाजपा - 03 विजयी

कॉग्रेस - ००

राष्ट्रवादी - 01

बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट )- 00

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना - 00



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply