गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यांना आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले. दोन्हीबाजूचे युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने आपला निकाल दिला आहे. गुणरत्न सदावर्तेंना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी त्यांची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवण्यात आली होती.

एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवास स्थानाबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनावेळी काहींनी चपला भिरकावल्या. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना सदावर्तेंनी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी (Police) सदावर्तेंना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची चौकशी केल्यानंतर सदावर्तेंवर गुन्हा नोंदवून अटक केली होती.

त्याचबरोबर सदावर्तेंवरती एसटी कर्मचाऱ्यांकडून 300 ते 400 रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोपही आहे. तब्बल 74 हजार कर्मचाऱ्यांना फसवल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी पैसे गोळा केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. अनेक ठिकाणच्या आगारातील कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन गुणरत्न सदावर्तें आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply