खरी शिवसेना कुणाची? आज सुप्रीम कोर्ट देणार निकाल

मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आता शिवसेना कुणाची हा नवा वाद सुरू झाला आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे.

एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवा. हे सरकार बेकायदेशीररित्या अस्तित्वात आलं आहे. तसेच शिवसेनाही ठाकरेंची आहे आणि धनुष्यबाण हा आमचाच आहे, असे म्हणत ठाकरे गट सुप्रीम कोर्टात पोहोचला. ठाकरे गटाकडून शिंदे विरोधात तब्बल चार याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिके वरती गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. त्यावेळेस कोर्टाने दोन्ही पक्षांना पुढची तारीख एक ऑगस्ट अशी दिली होती. मात्र या तारखेत बदल होऊन ही सुनावणी तीन ऑगस्टवरती गेली. त्यामुळे या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.

सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला होता. दोन्ही बाजूंना 27 जुलैपर्यंत आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालय आज करणार आहे.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी घटनापीठ स्थापन केले जाऊ शकते असे संकेत दिले होते. त्या दिवशी न्यायालयाने सर्व पक्षकारांना आपापसात बोलून सुनावणीच्या मुद्यांचे संकलन सादर करण्यास सांगितले होते. दोन्ही गटांच्या नेत्यांच्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून या याचिकांमध्ये आमदारांना अपात्र ठरवणे, शिंदे गटाला राज्यपालांच्या वतीने निमंत्रण, विश्वासदर्शक ठरावात शिवसेनेचे दोन व्हिप जारी करणे असे अनेक मुद्दे आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply