राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून मंत्रालयातील आपल्या दालनातून कामास सुरुवात केली. त्यांनी आज राज्यात सध्या सुरु असलेल्या तसेच इतर प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यातील महापूर तसेच अतिवृष्टीमधील माणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठीच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. या योजनेचा डीपीआर तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. ते बैठक संपल्यानंतर मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी “आज जागतिक बँकेसोबत आणखी एक बैठक झाली. मागील काळात सांगली आणि कोल्हापूरला पूर आला होता. दरवर्षी असाच पूर आला, तर काय करायचे यावर आपण अभ्यास केला होता. जागतिक बँकेच्या मदतीने आपण एक अप्रुव्हल घेतलं होतं. यामध्ये वळण बंधारे आणि टनेल सिस्टीमच्या माध्यमातून पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? यावर अभ्यास करण्यात आला,” अशी माहिती दिली.
तसेच, “सांगली आणी सोलापूर भागातील जे पुराचं पाणी आहे; ते महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या हिश्श्याव्यतिरिक्त आहे. तेव्हा आपण त्यावर अभ्यास केला होता. आज पुन्हा एकदा जागतिक बँकेसोबत आपण बैठक घेतली. त्यांची या प्रकल्पाला मदत करण्याची पूर्ण तयारी आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातही निर्देश दिले आहेत. त्यामुळे याचा डीपीआर तयार करुन जागतिक बँकेकडे देण्यात यावा, असे निदेर्शही देण्यात आले आहेत,” असे फडणवीस यांनी सांगितले.
“वाहून जाणारे जे पाणी आहे, ते गोदावरीच्या खोऱ्यात नेण्यासंदर्भात याआधी कारवाई केली होती. ती कारवाई पुन्हा सुरु करण्याबाबत आम्ही आढावा घेतला. हे काम टेंडर स्टेजपर्यंत घेऊन जावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. वळणगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात गोसीखुर्दच्या खाली वाहून जाणारं पाणी आहे, ते टनेलच्या माध्यमातून ४५० किमी आणायचे नियोजन होते. यामुळे जवळजवळ ५ ते ६ जिल्ह्यांना फायदा होणार होता. त्याचाही आज आढवा घेण्यात आला. हा प्रकल्प प्रशासकीय मान्यतेकरीता सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत,” असे फडणवीस यांनी सांगितले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र

- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel