
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये अर्पिता मुखर्जी यांच्यावर सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. पैशांचे ढीग या कारवाईत समोर येत आहे. यामुळे पश्चिम बंगालमध्ये उघड झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात अर्पिता मुखर्जीच्या अडचणीत वाढ झाली आहे. बुधवारी दुपारपासून ईडीचे पथक त्यांच्या दुसऱ्या घरी हजर असून तपास सुरू आहे. पहिल्या घराप्रमाणे येथेही मोठी रक्कम सापडली आहे. सापडलेली रक्कम मोजण्यासाठी ईडीला नोटा मोजण्याचे मशीन मागवले आहे. आतापर्यंत ईडीने 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून तीन किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे. एवढे मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन जाण्यासाठी ईडीने 20 ट्रंकही मागवले आहेत.
ईडीने अर्पिताच्या क्लब टाऊनमधील अपार्टमेंटवर छापा टाकला आहे. अशी माहिती मिळाली की तिथेही रोख लपवून ठेवण्यात आली आहे. आता ईडीच्या तपासात तेथेही पुन्हा नोटांचा ढीग सापडला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ईडीने 45 कोटींची रोकड जप्त केली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदेशी चलनही जप्त करण्यात आले आहे. मागच्या छाप्यात अर्पिताच्या घरातून 20 हून अधिक फोन आणि अनेक कंपन्यांचे कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती.
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांनाही ईडीने अटक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी त्यांची अनेक तास चौकशीही करण्यात आली आहे. अर्पिताच्या घरातून ईडीला एक डायरी मिळाली आहे. ही डायरी बंगाल सरकारच्या उच्च आणि शालेय शिक्षण विभागाची असल्याचे सांगण्यात येत आहे. या डायरीत बऱ्याच नोंदी देखील आहेत. या डायरीतून या घोटाळ्याचे अनेक पैलू समोर येऊ शकतात.
घोटाळा 1000 कोटींचा असल्याचा दावा
घोटाळा उघड झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. पार्थ चॅटर्जीच्या अटकेने ममता यांची अडचण वाढली आहे. शिक्षक घोटाळा 40-50 कोटींचा नसून 1000 कोटींहून अधिकचा असल्याचा दावा भाजप नेते दिलीप घोष यांनी केला आहे. या घोटाळ्याविरोधात भाजप आज रॅली काढणार आहे.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


