किल्ले राजगड पायथ्याशी ४२५ व्या ऐतिहासिक राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात

वेल्हे,(पुणे ) : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंचा ४२५ वा जन्मोत्सव ऐतिहासिक सोहळा उत्साहात आज गुरुवारी (ता. १२) रोजी किल्ले राजगडाच्या पायथ्याला पाल बुद्रुक( ता.वेल्हे ) येथे उत्साहात पार पडला.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववानांचा गौरव मावळा जवान संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. ढोल ताशा, तुतारी च्या निनाद व जिजाऊ, शिवरायांच्या जयघोषाने राजगडाची दरी खोरी दुमदुमून गेली.

पारंपारिक राजमाता जिजाऊ यांच्या पालखी मिरवणूकीने शिवकाळ जागा झाला राजगड तोरणा गडाच्या शिवकालीन मार्गावरुन ढोल ताशा तुतारी च्या निनाद व जिजाऊ शिवरायांच्या जयघोषात पालखी मिरवणूक मावळा तिर्थावर आली.

हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पारंपारिक रिवाजात पुजन करून मानवंदना देण्यात आली .

रायरेश्वराचे शिवाचार्य सुनिल स्वामी जंगम यांच्या शिव जिजाऊ वंदनेने सोहळ्यास प्रारंभ झाला. पहाटे हणुमंत दिघे व शिवाजी भोरेकर यांच्या हस्ते राजगड पुजन करण्यात आले. प्रास्ताविक दत्ता नलावडे यांनी केले.

कर्नल सुरेश पाटील, मनपाचे उपायुक्त रमेश शेलार,वेल्हेचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे , सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार, कोल्हापूर येथील शिवकन्या प्रतिष्ठानचे किरण गुरव, राजाभाऊ पासलकर ,सरनौबत येसाजी कंक यांचे वंशज संजय कंक, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेश मोहिते,

सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज ऋषिकेश गुजर, राष्ट्रसेवा समुहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, सुनिल राजेभोसले, संतोष शिवले, दत्तात्रय पाचुंदकर, गणेश राऊत, सरपंच निता खाटपे, विनोद माझिरे, नाना शिळीमकर, शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ आदी उपस्थित होते.

शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर यांनी व्याख्यानातुन जिजाऊं , शिवराय यांच्या विश्वंवदनिय शौर्याचा इतिहास जिवंत केला. राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने शिरुर येथील जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर व बारामती येथील लेखिका अर्चना सातव यांचा सन्मान करण्यात आला.

तर राष्ट्रीय मावळा भुषण पुरस्काराने चिंबळी येथील शिवाजी बबनराव गवारे , भोर येथील समीर घोडेकर व खेड येथील दिव्यांग उद्योजक अमोल चौधरी यांचा तसेच राष्ट्रीय गुणवंत खेळाडू पुरस्काराने पुण्यातील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू संपन्न रमेश शेलार यांचा सन्मान करण्यात आला.

छत्रपती महाराणी ताराराणी गौरव पुरस्काराने कोल्हापूर येथील पुजा यमगर,शिवानी कोळी,साक्षी मोहिले, यांचा व आदर्श शिक्षक पुरस्काराने पुण्यातील प्रा.किर्ती शशिकांत जाधव, मधुबाला कोल्हे , काळदरी येथील प्राचार्य पांडुरंग पाटील व आदर्श सरपंच पुरस्काराने मेरावण्याचे सरपंच सत्यवान रेणुसे यांचा व राजगडावर चढाई करणाऱ्या तीन वर्षे वयाच्या आरोही राजेंद्र रणखांबे हिच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

यावेळी राजगड तोरणा भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सुत्रसंचलन संजय भिंताडे व शशिकांत जाधव यांनी केले. संयोजन तानाजी भोसले,विजय महाराज तनपुरे,

लक्ष्मण दारवटकर, अर्जुन खाटपे, पप्पू गुजर, रोहित महापुरे , रोहित नलावडे,निलेश पांगारकर , संतोष वरपे,उमेश अहिरे, संदिप खाटपे, आप्पा जावळकर, प्रशांत भोसले, आप्पा जोरकर, मधुकर मालुसरे, गंगाराम शिर्के, अनंता खाटपे , आण्णासाहेब भरम, महेश पानसरे आदींनी संयोजन केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply