‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो यात्रे’ची ट्विटर खाती ब्लॉक करण्याच्या आदेशाला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

बंगळुरू येथील न्यायालयाने सोमवारी ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो यात्रे’ची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा आदेश दिला होता. कॉपीराईट नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बंगळुरू न्यायालयाने हा आदेश जारी केला होता. ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो यात्रे’ची ट्विटर खाती तात्पुरत्या स्वरुपात ब्लॉक करण्याचा आदेश दिला होता.

सोमवारी दिलेल्या या आदेशानंतर, दुसऱ्याच दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्विटर, फेसबूक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरून संबंधित सर्व कॉपीराइटचं उल्लंघन केलेली सामग्री काढून टाकावी, असं म्हटलं आहे. यासाठी उद्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे.

‘एमआरटी म्युझिक’ कंपनीने काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनाटे यांच्याविरोधात यशवंतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काँग्रेसने ‘केजीएफ-२’ या चित्रपटातील संगीत बेकायदेशीरपणे वापरल्याचा (कॉपीराइट) आरोप कंपनीने केला होता.

एमआरटी कंपनीने न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि युक्तीवाद ऐकल्यानंतर, बंगळुरू न्यायालयाने काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचे आदेश ट्विटर कंपनीला दिले होते. पण आज कर्नाटक उच्च न्यायालयाने बंगळुरू न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply