कल्याण : हातात झाडू अन् खांद्याला गोणी; पोलिसांची नजर चुकवून फिरणारा ATM चोर अटकेत

कल्याण : शहरातील पूर्वेतील एटीएम मशीन तोडून मशीनमधील पैसे चोरण्याचा प्रयत्न कोळशेवाडी पोलिसांनी उधळून लावला आणि एटीएम मशीन तोडून पैसे चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्याला कोलशेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. त्यानंतर या चोरट्याने सीसीटीव्ही आता पुढे आले असून हातात झाडू व खांद्याला गोणी लावून रात्री पोलिसांची नजर चुकवून हा चोरटा फिरत होता. 

कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक्सिस बँकेच्या एटीममध्ये एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कोलशेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एटीएम फोडून पैसे चोरणाऱ्या या चोरट्याला रंगेहाथ अटक केली.

हरकबहाद्दूर बुढ्ढा असा या चोरट्याचे नाव असून हा नेपाळ येथे राहणार आहे. काही दिवसांपूर्वी तो कल्याणमध्ये आला होता.त्याने एटीएम मशीन तोडली होती पैसे काढन्याच्या तयारीत असताना कोळसेवाडी पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर आता या चोरट्याने सीसीटीव्ही आता पुढे आले असून हातात झाडू व खांद्याला गोणी लावून रात्री पोलिसांची नजर चुकवून हा चोरटा फिरत होता

   


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *