कल्याण : ‘सेल्फी’ बेतली जीवावर, 500 फूट खोल दरीत पडून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू

कल्याण : उंचावर, टेकडीवर अथवा डोंगरावर जाऊन सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन मृत्यू झाल्याच्या घटना सातत्यानं वाढत आहेत. असाच काहीसा प्रकारमुंबईजळच्या मुरबाडमध्ये घडलाय. गडावर सेल्फी (Mobile Selfie) काढताना तोल जाऊन 500 फूट खोल दरीत पडल्यानं 17 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दामिनी ज्ञानेश्वर दिनकरराव असं या तरुणीचं नाव असून मुरबाडच्या गोरखगडावर हा प्रकार घडलाय.

दामिनी दिनकरराव ही शहापूर तालुक्यातील उंभ्रई गावाची रहिवासी होती. ती बुधवारी (6 एप्रिल) दुपारी काही मित्रांसोबत मुरबाड तालुक्यातील गोरखगडावर गेली होती. त्यावेळी गडावरील एका ठिकाणी ती मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात सेल्फी काढत होती. त्याचवेळी दरीच्या कडेला उभी असताना तोल जाऊन ती गडावरुन थेट दरीत कोसळली.

या घटनेनंतर दामिनीच्या मैत्रिणींनी मुरबाड पोलिसांना  ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुरबाड पोलिस आणि सह्यागिरी ट्रेकर संस्थेच्या मदतीनं तिचा मृतदेह पाच तासानंतर बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, यात पोलीस आणि अग्निशमन दलानं काहीच मदत केली नसल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. गावकरी आणि इतर लोकांच्या मदतीनं तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दामिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply