कल्याणमध्ये महिला आक्रमक, राणा दापत्यच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन

कल्याण - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असून हिंमत असेल तर अडवून दाखवा, असे आव्हान दिल्यानंतर शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा वाद सुरु झाला आहे. अत्यंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. कल्याणमध्ये शिवसेना शहर शाखे बाहेर महिला कार्यकर्त्यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या पोस्टरला जोडे मारत हे आंदोलन केले आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मुंबईला निघाले आहेत, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे.

राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि भोंग्यांच्या प्रकरणावरून वातावरण तापले आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्री समोर हनुमान चालिसा पठणावर ठाम आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी मुंबईत राणा दाम्पत्याच्या घरच्या परिसरात पहारा देत घोषणा बाजी सुरू केली. तर मातोश्री बाहेर देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले आहे. आज कल्याणामधून शेकडो शिवसैनिक मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुबईकडे जाण्यापूर्वी शिवसेना महिला कार्यकर्त्यानी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राणा दाम्पत्याच्या प्रतिमेला चपलेने मारत निषेध व्यक्त केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply