कदमवाक वस्ती दुर्घटनेबाबत कुटुंबीयांना तातडीने मदत द्यावी : वावा

पुणे : शहरातील कदमवाक वस्ती दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तातडीने मदत झाली पाहिजे. त्यांना आर्थिक मदतीसोबतच पक्के घर, रोजगार देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांनी दिले. कदमवाक वस्ती येथे ड्रेनेज लाइनचे काम करताना गेल्या दोन मार्च रोजी चार कामगारांच्या गुदमरून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेबाबत राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य डॉ. वावा यांनी आढावा घेतला. त्यांनी दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांशीही चर्चा करून सांत्वन केले. उपविभागीय अधिकारी संजय आसवले, सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, डॉ. सुधाकर पानीकर, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त संगीता डावखर, सरपंच गौरी गायकवाड, दक्षता समितीचे सदस्य ॲड. सागर चरण, पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, ग्रामसेवक अमोल घोळवे आदी या वेळी उपस्थित होते.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply