औरंगाबाद स्मार्ट सिटीचे दीडशे कोटी भरले

औरंगाबाद : बॅंकेकडून २५० कोटींचे कर्ज मंजूर झाल्यानंतर महापालिकेने यातून १५० कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटी अभियानासाठी स्वहिस्सा म्हणून भरला आहे. यापूर्वी महापालिकेने ६८ कोटी रुपये भरले होते. हे पैसे परत घेऊन एकदम १०० कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात भरले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरात पाच वर्षांत एक हजार कोटींची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात केंद्र शासनाचा ५०० कोटी तर राज्य व महापालिकेचा प्रत्येकी २५० कोटींचा वाटा आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत २९४ कोटी, राज्य सरकारने १४७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

महापालिकेने ६८ कोटी रुपयांचा स्वहिस्सा भरला होता. दरम्यान महापालिकेने स्वहिस्सा भरल्याशिवाय पुढील निधी वितरित केला जाणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली होती. तसेच स्मार्ट सिटी अभियानातील कामांच्या निविदा ३१ मार्च पूर्वी अंतिम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेतर्फे काही महिन्यांपासून स्वहिश्‍शाचा निधी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान राज्य शासनाच्या मंजुरीने राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून २५० कोटी रुपयांचे कर्ज महापालिकेने घेतले आहे. या कर्जाच्या रकमेतून १५० कोटी रुपये स्मार्ट सिटीमध्ये भरण्यात आले. उर्वरित शंभर कोटींचा निधी लवकरच भरला जाणार आहे. तसेच यापूर्वी भरलेले ६८ कोटी रुपये परत मागविण्यात आले आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

स्मार्ट सिटीचा हिस्सा भरण्यासाठी २५० कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे ही रक्कम स्मार्ट सिटीलाच जाईल. दरम्यान यापूर्वी भरण्यात आलेले ६८ कोटी रुपये परत घेऊन ते शहरातील विकास कामांसाठी, थकीत बिले देण्यासाठी वापरली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply