औरंगाबाद : वेरुळ, खजुराहोमध्ये उद्वाहन बसविण्यास परवानगी ; जागतिक पर्यटन स्थळी देशातील पहिला प्रयोग

औरंगाबाद: वेरुळ व खजुराहो येथील लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या विकलांग व्यक्तींची सोय व्हावी म्हणून उद्वाहक उभारणीचा प्रस्ताव भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने मान्य केला आहे. येत्या काही दिवसात वेरुळ येथील १६ क्रमांकाच्या लेणीमध्ये उद्वाहक बसविण्यासाठी निविदा काढल्या जातील, असे औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मीलनकुमार चावले यांनी सांगितले. जागतिक पर्यटन स्थळी प्राधान्याने अपंग व्यक्तींसाठी उद्वाहन देण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.

जागतिक वारसा स्थळांमध्ये अनेक बाबींवर निर्बध आहेत. वेरुळ येथील लेणींमध्ये उद् वाहन बसविण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून चर्चेत होता. मात्र, त्यास मंजुरी मिळत नव्हती. वेरुळ व खजुराहो या दोन ठिकाणी हे उद्ववाहन बसविण्यास मान्यता देण्यात आली आहे. वेरुळमध्ये येणाऱ्या पर्यटकांना एका लेणीतून दुसऱ्या लेणीत पोहोचण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहनेही घेण्यात आली आहेत. त्याचे उद्घाटनही स्वातंत्र्य दिनापासून होण्याची शक्यता आहे. सर्व तयारी झाली, मात्र अद्याप कोणत्या दिवशीपासून ही सेवा सुरू करायची हे ठरलेले नाही. मात्र, या महिन्यात बॅटरीवर चालणारी वाहने पर्यटकांच्या सेवेत येतील. तर विकलांग व्यक्तींना उद्वाहनातून वर जाण्याची सोयही करून दिली जाणार आहे. या उद्ववाहन खूर्चीसह विकलांग व्यक्ती वर जाऊ शकेल या क्षमतेचे असेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply