औरंगाबाद : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आणि आर्थिक वर्ष संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. राहिलेल्या दिवसांत मालमत्ता कर वसुलीसाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जाणार आहे. तर ज्यांच्याकडे वर्षानुवर्षे दाद देत नाहीत अशा थकबाकीदारांवर (ता.२१) थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
कोरोना महामारीमुळे २०२० पासून महापालिकेचे शाश्वत उत्पन्नाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. तथापि आता कोरोनाची लाट ओसरली आहे. बाजारपेठा सुरू झाल्या, औद्योगिक कंपन्यांसह सर्व व्यवहारदेखील पूर्वपदावर येत आहेत.
त्यामुळे मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीकडे महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षांत डिसेंबर अखेरपर्यंत १०० कोटी रुपयांची कर वसुली झाली. मात्र, मध्यंतरी कोरोनाची तिसरी लाट आली आणि कर वसुली पुन्हा थोडी थंडावली.
घराघरांत कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे कर वसुली पथकांनी देखील वसुलीचे काम थांबविले होते. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची अपेक्षेप्रमाणे वसुली झाली नाही. तरीही या दोन महिन्यांत ३५ कोटी रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला. आता सोमवारपासून (ता.२१) मार्च महिन्यातील केवळ ११ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीवर महापालिका अधिक भर देणार आहे, अशी माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली.
महापालिकेने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय बैठका घेऊन पथके स्थापन केली आहेत. मालमत्ता कर वसुलीचे यंदाचे उद्दिष्ट ४६८ कोटी रुपये देण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत १०९. ८० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. तर २९.३२ कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल केली आहे. पुढील अकरा दिवसांत होता होईल तेवढे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.
हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


