औरंगाबाद : इलेक्ट्रिक वाहनांकडे वळावेच लागेल – ऋषी बागला

औरंगाबाद : भारतीय अर्थव्यवस्थेची होणारी वाढ लक्षात घेता २०५० पर्यंत ती २० ट्रीलियन नेण्याचे उद्दिष्ट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाढीमुळे देशातील वाहनांची संख्या आठ पटीने वाढण्याचा अंदाज आहे. या वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करायचे असेल आणि पुढच्या पिढीला चांगले वातावरण द्यायचे असेल तर आजच आपल्याला प्रदूषण न करणाऱ्या ईव्ही पर्यायाकडे वळावे लागेल, असे मत ऋषी बागला यांनी शुक्रवारी (ता.२५) व्यक्त केले.

औरंगाबाद मिशन फॉर ग्रीन मोबिलिटीद्वारा आयोजित ईव्ही तीनचाकी प्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या पुढाकाराने सुरू झालेला उपक्रमाचा एक भाग म्हणून २५ आणि २६ मार्चला मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे ईव्ही तीनचाकी लोडिंग रिक्षा आणि प्रवासी वाहनांचे दोनदिवसीय प्रदर्शन आयोजित केले आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बगला ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ऋषी बागला, सीआयआय महाराष्ट्र चेअरमन एन. श्रीराम, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू आणि एसबीआय डीजीएम रवी वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

ऋषी बागला म्हणाले, की शहराने नेहमीच पुढाकार घेत नवीन गोष्टी आत्मसात केल्या आहेत. मागील काही वर्षांत देशात मुख्यत्वे महानगरांमध्ये प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही परिस्थिती औरंगाबादेत होऊ नये म्हणून औरंगाबादकर पावले टाकत आहे ही चांगली बाब असल्याचे सीआयआय महाराष्ट्राचे चेअरमन एन. श्रीराम म्हणाले, की देशात ईव्ही वापराचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे. ईव्ही वाहनांचा वापर वाढेल तेवढी नवीन गुंतवणूक होईल आणि या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढेल. शिवप्रसाद जाजू, एसबीआय डीजीएम रवी वर्मा, प्रसाद कोकीळ, मुनीश शर्मा, आशिष गर्दे, उल्हास गवळी, उमेष दाशरथी, जयंत पाडळकर, सतीश लोढा, सतीश लोणीकर नारायण पवार, गजानन देशमुख अर्जुन गायकवाड, विजय जैसवाल, दुष्यंत आठवले आणि प्रतिनिधी उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply