औरंगाबादेत ट्रक आणि कारचा भीषण अपघात; माजी जिल्हा परिषद सदस्याचा जागीच मृत्यू

औरंगाबादमधून रस्ते अपघाताचं मोठं वृत्त हाती आलं आहे. औरंगाबादच्या कन्नड चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील औट्रमघाटात एका ट्रकने कारला मागून जोराची धडक दिली. सोमव या घटनेत माजी जिल्हा परिषद सदस्या यमुनाबाई रामचंद्र पवार यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या कन्नड चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील औट्रमघाटात एका ट्रकने कारला पाठमागून जोराची धडक दिल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला कार धडकली. सोमवारी ही अपघाताची घटना घडली आहे.

Follow us -

औरंगाबादच्या कन्नड चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही ट्रकच्यामध्ये कार दबली गेल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चिंचोली लिंबाजी येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यमुनाबाई रामचंद्र पवार यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. तर जखमींमध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply