उस्मानाबादेत स्वतंत्र मराठवाड्यासाठी संवाद परिषद; वकील गुणरत्न सदावर्ते करणार मार्गदर्शन

मराठवाड्याचा अविकसितपणाचा कलंक, द्रारिद्रयपणा कायमचा नाहीसा करण्यासाठी मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्याच्या मागणीसाठी संवाद परिषदेचे विधीज्ञ ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.

यासाठी मराठवाड्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते , बुद्धिवंतानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा मुक्ती मोर्चाचे कडून करण्यात आले आहे. स्वतंत्र्य विदर्भाच्या मागणीनंतर आता स्वतंत्र्य मराठवाड्याची मागणी समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

या परिषदेत मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा चालू आहे. याच लढ्याचा एक भाग म्हणून शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह उस्मानाबाद येथे एक दिवशीय संवाद परिषदेचे आयोजन केले आहे. दरम्यान या सवांद परिषेदेला एस टी कर्मचारी संपाला एक वेगळ्या वळणावर घेऊन जाणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे या संवादात गुणरत्ने नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी स्वतंत्र्य मराठवाड्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. ' महाराष्ट्राचे वेगवेगळे प्रांत तयार करणे ही एक विघातक प्रवृत्ती आहे. महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे. विकासाच्या दृष्टीने नक्कीच अन्याच झाला असेल, म्हणून लगेच वेगळं निघण्याची भूमिका घेणे हे चुकीचे आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

'गुणरत्न सदावर्ते यांना पुढे करुन संवाद परिषदेचे आयोजक कोण? ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत हे मी सांगायची गरज नाही. सदावर्तेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कशा पद्धतीने भूमिका मांडायची, असा दुटप्पीपणा महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोकांनी मांडला आहे, अशी टीका देखील दानवे यांनी केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply