राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. या मिळवलेल्या मोठ्या यशानंतर आता विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजप नेते आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील पुनर्निवडीबाबत मोठे विधान केले आहे. संख्याबळाअभावी ठाकरे पुन्हा सभागृहात पोहोचू शकतील का, याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.
जनतेने विरोधकांना नाकारले
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा निकाल आज जाहीर होणार आहे. हा निकाल जाहीर होण्यापूर्वी पंकज भोयर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंकज भोयर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आजच्या निकालात महायुतीला मिळालेले यश हे सरकारने केलेल्या कामाची पावती आहे. जनतेने विरोधकांना नाकारले असून, विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने त्यांची त्रेधा तिरपट उडाली आहे. याच कारणामुळे काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असावा, असे पंकज भोयर म्हणाले.
यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील पुनर्निवडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. असं वाटतंय की उद्धव ठाकरे पुन्हा कोणत्याही सभागृहात पोहोचू शकणार नाहीत, असे विधान पंकज भोयर यांनी केले.
ठाकरे गटाकडे केवळ २० आमदार
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत मे २०२६ मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर भोयर यांनी ठाकरेंच्या अडचणींकडे लक्ष वेधले. विधानसभेतील सध्याच्या गणितानुसार, ठाकरे गटाकडे केवळ २० आमदार आहेत. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा (साधारण २९-३० मते) गाठणे त्यांच्यासाठी कठीण आहे. ठाकरेंना पुन्हा निवडून येण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या जादा मतांची गरज भासणार आहे. मात्र, महाविकास आघाडीत सध्या राज्यसभेच्या जागांवरूनही ओढाताण सुरू असल्याची चर्चा आहे. यावरुनच पंकज भोयर यांनी टीका केली.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या राजकीय प्रवेशावरही पंकज भोयर यांनी टोला लगावला. ते अभिनेते आहेत, पण ते सक्रिय राजकारणात राजकीय चर्चा कधीपासून करायला लागले? यावर विश्वास बसत नाही, असे पंकज भोयर यांनी म्हटले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


