ईडीची नोटीस मिळताच राज ठाकरेंनी ट्रॅक बदलला; छगन भुजबळांचा प्रहार

ईडी, सीबीआय, आयकरचा केंद्र सरकार दुरुपयोग करत आहे. जर मविआ चुकत असेल, तर जनता आम्हाला नाकारेल. त्यामुळं राजकारण करत असताना रडीचा डाव खेळू नये. तसंच ईडीचा कायदा म्हणजे राक्षसी कायदा असल्याचं स्पष्ट मत मंत्री छगन भुजबळ  यांनी व्यक्त केलंय. ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.  

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, ईडीचा केवळ शिवसेनेलाच त्रास नाही, तर राष्ट्रवादीचे दोन मंत्रीही आतमध्ये आहेत. आम्हालाही याचा त्रास होतोय. त्यामुळं लोकशाही ज्यांच्या अंगात भिनलेली आहे, असे लोक कधीच शांत बसू शकत नाहीत. भाजपची दादागिरी आता लोकांना कळू लागलीय, असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय.

ईडीची नोटीस मिळताच राज ठाकरेंनी आपला ट्रॅक बदललाय. ईडी, सीबीआय, आयकरचा केंद्र सरकार दुरुपयोग करत आहे. जर मविआ चुकत असेल, तर जनता आम्हाला नाकारेल. त्यामुळं राजकारण करत असताना रडीचा डाव खेळू नये, असा इशाराही भुजबळांनी दिलाय.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *