आफ्रिकेविरुद्ध मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, तीन खेळाडू संघाबाहेर

ऑस्ट्रेलिया विरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका भारताने खिशात घातली आहे. त्यानंतर आता भारतीय संघ घरच्या मैदानावर दुसरी ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे. २८ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरोधात ट्वेन्टी-२० मालिका होणार असून, भारतीय संघ देखील जाहीर झाला होता. तर, मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघही भारतात दाखल झाला आहे.

मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचे तीन स्टार खेळाडू संघाबाहेर झाले आहेत. त्यामुळे संघाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तीन खेळाडू बाहेर गेल्याने कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचा स्टार खेळाडू दीपक हुड्डा दुखापतीमुळे, तर गोलंदाज मोहम्मद शमी करोनाची लागण झाल्यामुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. तसेच, खेळाडू हार्दिक पांड्याला बीसीसीआयने विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन बाहेर, तीन आतमध्ये

हार्दिक पांड्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमदला संघात घेण्यात आलं आहे. दीपक हुड्डाच्या जागी श्रेयस अय्यर तसेच, मोहम्मद शमीच्या बदल्यात उमेश यादवला संधी मिळाली आहे. उमेश यादव तिरूअनंतरपुरमला संघासह पोहचला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, मोहम्मद शमी अद्यापही करोनातून बरा झालेला नाही. त्याला तंदूरुस्त होण्यासाठी अजून काही काळाचा अवधी पाहिजे आहे. त्यामुळे तो अफ्रिका दौऱ्यातून बाहेर असणार आहे.”

भारत विरुद्ध अफ्रिका सामने

पहिली ट्वेन्टी-२० – २८ सप्टेंबर ( तिरूअनंतपुरम )
दुसरी ट्वेन्टी-२० – २ ऑक्टोबर ( गुवाहाटी )
तिसरी ट्वेन्टी-२० – ४ ऑक्टोबर ( इंदूर )
पहिला एकदिवसीय – ६ ऑक्टोबर ( लखनौ )
दूसरा एकदिवसीय – ९ ऑक्टोबर ( रांची )
तिसरा एकदिवसीय – ११ ऑक्टोबर ( दिल्ली )



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply