पुणे - मंगळवार पेठेतील नानुबाई मंडळी या ६५ वर्षांच्या आजींनी आगळा वेगळा उपक्रम राबविला. घरोघरी फिरून होळीत टाकल्या जाणाऱ्या पुरणपोळ्या गोळा केल्या आणि त्यांची राख न करता भुकेलेल्यांचा जठराग्नी शांत करून त्यांचाही सण गोड केला.
होळीच्या दिवशी अग्नीत नैवेद्य म्हणून पुरणपोळी टाकण्याची परंपरा आहे. परंतु, नानुबाई या गेल्या सहा वर्षांपासून या बाबत नागरिकांचे प्रबोधन करीत आहेत. मंगळरवार पेठेतील इंदिरानगर ते पारगे चौका दरम्यान पेटविण्यात येणाऱ्या होळीच्या परिसरात त्या सायंकाळी फिरतात. नागरिकांना पुरणपोळी अग्नीत न टाकण्याची विनंती करतात आणि त्यांच्याकडून घेतलेल्या पुरणपोळ्या त्या एका टोपलीत गोळा करतात. या पोळ्या मालधक्का ते ससून येथील गरजूंना अन्नदान करतात. नैवेद्य म्हणून दाखवा पण अग्नीत टाकू नका, अशी विनंती नानुबाईंनी नागरिकांना केली. स्वतः फिरून सुमार १०० ते ११० पुरणपोळ्या गोळ्या केल्या होत्या. समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. गरजूंना देखील सण उत्साहाचा आनंद घेण्यात यावा, असे त्यांना वाटते.
महापालिकेच्या स्वच्छता विभागातून त्या निवृत्त झाल्या. रस्त्यांवर झाडू मारण्याचे सुमारे २४ वर्षे त्यांनी काम केले. ‘समाजासाठी फार काही करता आले नाही तरी, गरीबांचे सणाच्या दिवशी तोंड गोड करता येते, त्याचेच समाधान आहे,’ अशी नानूबाईंची भावना आहे. अन त्यासाठीच दरवर्षी नव्या उमेदीने त्या पुरणपोळ्या गोळा करण्याचा उपक्रम राबवितात आणि गरजूंचा सण साजरा करतात.
अंनिसकडून १५०० पोळ्यांचे वाटप
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि स्वाभिमानी संघटना यांच्यातर्फे होळीच्या दिवशी ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्यातून गोळा झालेल्या १५०० पोळ्यांचे वाटप पुणे स्टेशन आणि सिंहगड रस्ता परिसरात करण्यात आले. समिती गेल्या २० वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे. होळीमध्ये पोळी न टाकता ती आम्हाला द्या, आम्ही ती भुकेलेल्यांना दान करू. पोळीची राख करण्यापेक्षा भुकेलेल्यांच्या पोटात अन्न जाऊ द्या, असे म्हणत वसंत कदम, हसन बारटक्के, अनुराधा काळे, अनिल वेल्हाळ, सविता म्हेत्रे चेतन झेंडे आदी कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले.हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


