आंतराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा नियमितपणे सुरू होणार ,काय आहेत गाईडलाईन्स?

देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे केंद्र सरकारने आंतराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ मार्च 2022 पासून ही सेवा सुरू होणार आहे पण, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार कोरोनाचे संकटामुळे मागील दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती पण उद्यापासून (ता.२७) ही बंदी रद्द करण्यात येणार आहे. सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर सरकारने आंतराराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा (International Commercial Passenger Services) पुर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहेत गाईडलाईन्स

  • COVID19च्या दिशा-निर्देशकांनुसार, International Flights वर ३ जागा रिक्त ठेवण्यावरील बंदी हटविण्यात आली आहे.
  • कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे क्रू मेंबर्ससाठी संपूर्ण पीपीई किट परिधान करण्याची गरज नाही
  • विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांद्वारा Pat-down search पुन्हा सूरू होणार आहे.
  • विमानतळावर किंवा विमान प्रवासादरम्यान मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.

    कर्मशिअल फ्लाईट्स केव्हा सूरू होणार

    नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी भारतातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानसेवा 23 मार्च 2020 पासून बंद करण्यात आली होती. पण आता लसीकरण कार्यक्रमाला वेग आला आहे आणि कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत, त्यामुळे सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

    नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी दिली ही माहिती

    विशेष म्हणजे, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अलीकडेच सांगितले होते की.'' पुढील दोन महिन्यांत विमान वाहतूक पूर्व-कोविड पातळीवर पोहोचेल अशी त्यांची अपेक्षा आहे.'' त्याच वेळी, ते म्हणाले होते की, ''यामध्ये सहभागी असलेल्या स्टेक होल्डर्ससोबत संवाद सुरू आहेत, जेणेकरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत करता येईल.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply