मुंबई : अ‍ॅडमिशनच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या प्राध्यापकास अटक

'डी फार्मा'मध्ये प्रवेशाच्या नावाखाली दोन डझनहून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपी प्राध्यापकालाअटक करण्यात आली असून मुंबईच्या कुरार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मुंबईच्या आर. के महाविद्यालयात 'डी फार्मा'मध्ये प्रवेशाच्या नावाखाली २४ हून अधिक विद्यार्थ्यांची एका शिक्षकाने फसवणूक केली. परीक्षा उत्तीर्ण आणि प्रवेशाच्या नावाखाली लोकांकडून जवळपास २ लाखांची रक्कम उकळली गेली. संजय दुबे असे या आरोपीचे नाव असून तो आर. के महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे

या प्रकरणाचा सुगावा लागताच मुंबईच्या कुरार पोलिसांनी आरोपी प्राध्यपकाला अटक केली. आरोपी संजयने अनेक विद्यार्थ्याकडून अ‍ॅडमिशनच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचे तपासात उघडकीस आले आहेत. मुंबईच्या कुरार पोलीसांनी संजयला अटक केल्यानंतर बोरिवली न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाची आणखी कसून चौकशी करत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply