अहिल्यानगरात गँगवॉर, धाड धाड गोळ्या झाडल्या, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात भयंकर गँगवॉर घडले आहे. दोन गटांनी समोरासमोर येऊन बेछुट गोळीवार केल्याने जिल्हा हादरला आहे. या गँगवॉरमध्ये एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे ही गँगवॉरची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्रीच गोळीबारात अबरार शेख ही व्यक्ती जखमी झाली होती. त्यानंतर आज पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने जिल्हा हादरला आहे.

एक जण ठार तर एक जखमी

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गँगवॉरची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आल्याने दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला आहे. या भयंकर घटनेत नितीन शिरसाठ याचा मृत्यू झाला असून सूरज फुलमाळी हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या सूरज फुलमाळी याला पुढील उपचारासाठी पुण्याकडे हलविण्यात आले आहे.

अहिल्या नगरात दोन गटात गँगवॉर घडले आहे. या ठिकाणी दोन गटात जुन्या वादावरुन भांडणे होत. या वादाचे पर्यावसन थेट गोळीबारात झाले. या घटनेत जखमी झालेल्या नितीन शिरसाठ आणि सूरज फुलमाळी यांना सुरुवातीला अहिल्यानगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारासाठी आणल्यानंतर रुग्णालय परिसरातही दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण होऊन राडा झाल्याचे वृत्त आहे. रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे थोडक्यात येथेही खूनखराबा टळला. मात्र,काही काळ हॉस्पिटल परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.

कायदा-सुव्यवस्था धोक्यात

या  प्रकरणात आणखी दोन संशयित आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या वादाचे कारण काही कळालेले नाही. परंतू जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचे पोलिस अधिक्षकांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले. या घटनेनंतर आता पोलीस बंदोवस्तात वाढ केली असून या प्रकरणाची चौकशी पोलीस करीत आहेत. नेवासा तालुक्यातील बाजारपेठा या घटनेनंतर धडाधड बंद करण्यात आल्या. अचानक दोन्ही गटांनी एकमेकांच्यावर गोळीबार केल्याने एखाद्या चित्रपटात शोभेल असे गँगवॉवर नेवासात घडल्याने घबराट उडाली आहे. बुधवारी रात्री येथे गोळीबारात अबरार शेख जखमी झाला होता. त्यानंतर काही तासांनी येथे गुरुवारी येथे दोन गटात गोळीबार झाल्याने तालुक्यात कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *