अहमदाबाद :  AYUSH थेरेपीसाठी येणाऱ्या विदेशी नागरिकांना खास व्हिसा : PM मोदी

अहमदाबाद : विदेशी नागरिकांना भारतात येऊन आयुष थेरेपीचा (Ayush Therapy) लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी भारत सरकार पुढाकार घेत आहे. भारत लवकर विशेष आयुष व्हिसा कॅटेगरी (Special Ayush Category) सुरू करणार आहे. त्यामुळे विदेशी लोकांना भारतात येऊन आयुष थेरेपी घेणे सोयीस्कर ठरेल, असं पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले. गुजरातमधील गांधीनगर येथे जागतिक आयुष गुंतवणूक आणि इनोव्हेशन शिखर परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

आयुषच्या क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी शक्यता आहे. आयुष औषधे, सौंदर्यप्रसाधने यांच्या उत्पादनात आधीच अभूतपूर्व वाढ झाली आहे. गेल्या २०१४ मध्ये आयुष क्षेत्रात ३ अब्ज डॉलर्सपेक्षा कमी होते. आज ही गुंतवणूक १८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. भारत लवकरच एक आयुष मार्क तयार करणार असून भारतात निर्माण होणाऱ्या उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांवर हे मार्क लावण्यात येणार आहे. यामुळे जगभरातील लोकांचा आयुषच्या दर्जेदार उत्पादनावरील विश्वास वाढेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांनी देखील यावेळी संबोधित केले. महात्मा गांधींच्या भूमीवर येण्याचा मान मला मिळाला. सामान्य आणि पारंपरीक औषधांसाठी दीर्घ धोरणात्मक गुंतवणुकीची गरज आहे, असं टेड्रोस म्हणाले. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल हे देखील उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply