
अहमदनगर, राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. उंबरे येथे माळवाडी शिवारात काल, शुक्रवारी रात्री सातेसात वाजता राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर एका भरधाव कारने पाच जणांना उडविले. यात दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. संतापजनक बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर कारचालकाने जखमीला मदत न करता कार भरधाव वेगात पळवली आणि यानंतर पुढे दोन दुचाकींना धडक देत त्यावरील चौघांना गंभीर जखमी केले. संजय उर्फ सांडू अर्जुन हिवराळे (वय ३२) आणि कैलास छबुराव पंडित (वय ४५, दोघेही रा. माळवाडी, उंबरे) अशी मृतांची नांवे आहेत. तर सुरेश झुगाजी ससाणे, सोन्याबापू बाबासाहेब गायकवाड आणि बादशहा शेख (तिघेही रा. माळवाडी, उंबरे) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिशिंगणापूरच्या दिशेने एक कार (एमएच ०९ बीएक्स ३६१६) भरधाव वेगाने चालली होती. मोलमजुरी करुन उपजिविका करणारे सुरेश ससाणे रेस्त्याने पायी चालले होते. त्यांना कारने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झालेले सुरेश ससाणे यांना मदत न करता या कार चालकाने भरधाव वेगाने कार शनिशिंगणापूरच्या दिशेने नेली. पुढे एक किलोमीटर अंतरावर पोहोचला असता त्याने आणखीन दोन दुचाकींना कारने जोरदार धडक दिली. या दोन दुचाकींवर एकुण चारजण प्रवास करत होते. हे चौघेही बांधकाम मजुरी करणारे कामगार होते.
या अपघाताची माहीती समजल्यानंतर स्थानिक तरुण सुभाष वैरागर, लालासाहेब वैरागर आणि इतरांनी तत्परता दाखवत मदकार्य केले. यावेळी दोन रुग्णवाहिकांमधून सर्वांना नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, या भरधाव कारने पाच २ पुढे एका ओढ्यावरील पुलाला धडक दिली. त्यामुळे, कार तेथेच सोडून कारमधील लोकांनी पलायन केले. या कारमधून तीन जण पळाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्यांपैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमींवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात कार चालकांविरुद्ध भरधाव वाहन चालवून रस्ता अपघातास आणि मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


