‘असे किती राज ठाकरे आले किती गेले’; पुण्यातील सभेला मुस्लिम समुदायाचा विरोध

पुणे: पुण्यातील २२ तारखेच्या राज ठाकरेंच्या सभेला मुस्लिम समुदायाने विरोध केला आहे. राज ठाकरे हे दंगली भडकावण्याचे काम करत असल्याने मुस्लीम समुदायाने विरोध केला आहे. आरक्षण, शेतकरी, भ्रष्टाचाराचे प्रश्न सोडून राज ठाकरे दंगली भडकावण्याच्या मुद्द्यांवर बोलतात असा आरोप मुस्लिम नेते युसुफ अन्सारी यांनी केला आहे. राज ठाकरेंनी हिंदू- मुस्लिमांबाबत भाषण केलं तर पुण्यात गुन्हे दाखल करून राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा अन्सारी यांनी दिला आहे. असे राज ठाकरे किती आले किती गेले पण आम्ही मिळून मिसळून राहणार असे मत युसुफ अन्सारी यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील मुस्लीम समाजात नाराजी पसरली आहे. मनसेच्या अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुढीपाडव्याच्या सभा, ठाण्यातील उत्तर सभा आणि औरंगाबादमधिल सभा यावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले. राज ठाकरेंनी भर सभेत सराकरला इशारा दिला होता. मशिदीविरोधात घेतलेल्या भूमिकेवरुन मनसेचे माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी भोंग्याविरोधात भूमिका घेतली त्यामुळे त्यांनी आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. आता उद्या राज ठाकरेंच्या पुण्याच्या गणेश कला क्रिडा मंचमध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply