
अमरावती : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दोनदिवसीय अमरावती दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या स्थानिक आमदार सुलभा खोडके यांना निमंत्रित न करण्यात आल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीविषयीच्या संघर्षांची ही नांदी मानली जात आहे.
वर्षभरापूर्वी माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर देशमुख गट आणि खोडके गट आमने-सामने येतील अशी शंका व्यक्त करण्यात येत होती, ती आता खरी ठरू लागली आहे. सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांच्या गटाचे स्वतंत्र राजकारण हे महापालिकेत आहे. डॉ. सुनील देशमुख आणि त्यांच्यात उघड संघर्ष नसला, तरी ते प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या निवडणुकीत खोडके यांनी डॉ. देशमुख यांचा पराभव केला होता, ही एक किनार या संघर्षांला आहे. काँग्रेस पक्षाच्या अनेक बैठका या डॉ. सुनील देशमुख यांच्या कार्यालयातील सभागृहात होतात. त्या बैठकींमध्ये सुलभा खोडके यांना निमंत्रित केले जात नाही. गेल्या वर्षभरात सुलभा खोडके या काँग्रेसच्या आंदोलनांमध्ये सहभागी झाल्या, पण त्यांना अनेक ठिकाणी डावलण्यात येत असल्याची भावना खोडके समर्थकांमध्ये निर्माण झाली. त्यातून खुला संघर्ष जरी नसला, तरी नाराजीचा सूर होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान तो उघड झाला आहे. डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश घेतल्यापासून आपल्याला स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही बैठकीला बोलाविण्यात आले नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यासंदर्भातदेखील आपल्याला कळवण्यात आले नाही. कुठलेली निमंत्रण मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये आपण हजर राहू शकले नाही, असे सुलभा खोडके यांचे म्हणणे आहे. मी आजपर्यंत कधीही काँग्रेस पक्षाची विचारधारा सोडून कोणत्याही पक्षात गेली नाही. मी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेस मध्ये प्रवेश केला. पक्षाच्या उमेदवारीवर व पंजाच्या चिन्हावर २०१४ मध्ये बडनेरा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती, अवघ्या पाच हजार मतांनी माझा पराभव झाला. २०१९ ला पुन्हा काँग्रेस पक्षाकडूनच अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवीत विजयी झाले, भाजपच्या उमेदवाराचा तब्बल २० हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे मी काँग्रेस पक्षामध्येच आहे, पुढेही मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असा दावा सुलभा खोडके यांनी केला आहे. पुढील आठवडय़ात पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन काँग्रेसमध्ये आपली अवहेलना होत असल्याबाबत माहिती देणार असल्याचे सुलभा खोडके यांचे म्हणणे आहे. अमरावती विधानसभा मतदार संघावर सुलभा खोडके आणि डॉ. सुनील देशमुख यांनी उमेदवारीचा दावा केल्यास संघर्ष कडवा होण्याचे संकेत आहेत.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

