अभिमानास्पद! भारतातील बीडी कामगार अमेरिकेत बनला न्यायाधीश

नवी दिल्ली - केरळमध्ये आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अगदी बीडीच्या कारखान्यात काम करणारा व्यक्ती अमेरिकेत एका जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश झाले. टेक्सासमधील फोर्ट बेंड काउंटी येथील २४० व्या न्यायिक जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली. सुरेंद्रन के पटेल अस त्यांचं नाव आहे. 

अमेरिकेत निवडणुकांच्या माध्यमातून जिल्हा न्यायाधीशांची निवड केली जाते. ५१ वर्षीय पटेल हे निवडणुकीच्या पहिल्या फेरीत विद्यमान न्यायाधीशांचा पराभव करून अमेरिकेत जिल्हा न्यायाधीश बनणारे पहिले मल्याळी ठरले आहे. गरीब कुटुंबात जन्मलेले पटेल यांचा न्यायाधीश होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मात्र त्यांनी निर्धाराने, मेहनतीने आणि इच्छाशक्तीने हे पद मिळवले.

पटेल यांचा जन्म केरळमधील कासारगोड येथे झाला. जिथे त्यांचे आई-वडील रोजंदारीवर काम करत होते. सुरेंद्रन पटेल यांचे बालपणीचे जीवन अडचणींनी भरलेले होते. शाळा-कॉलेजात शिकत असताना घर चालवण्यास मदत व्हावी, कुटुंब जगावे म्हणून त्यांनी अनेक कामे केली. पटेल यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बीडी बनवण्याच्या कारखान्यातही काम केलं.

एक काळ असा होता की, पटेल यांना दहावीत शाळा सोडून बीडी बनवण्याच्या कारखान्यात पूर्ण काम कराव लागलं. या कारखान्यात ते बिडीत तंबाखू भरायचे आणि नंतर पॅक करायचे. मात्र त्यांनी हार न मानता पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली आणि बीडी बनवण्याच्या कारखान्यातही काम केलं. पटेल यांचं लहानपणापासूनच वकील होण्याचे स्वप्न पाहू लागले, पण त्यांना पुढचा मार्ग माहीत नव्हता. मात्र अखेरच त्यांचा स्वप्न पूर्ण झालं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply