अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतात दोन बॉम्बस्फोटात नऊ ठार

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) बल्ख प्रांतात गुरुवारी (ता. २८) सायंकाळी दोन बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाले. या बॉम्बस्फोटात नऊ ठार तर १३ जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली. स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. 

टोलो न्यूजनुसार, दोन्ही स्फोट सार्वजनिक वाहतुकीला लक्ष्य करून करण्यात आले. बाल्ख प्रांतातील मजार-ए-शरीफ भागात हे बॉम्बस्फोट करण्यात आले. स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रांतीय आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींना तातडीने रुग्णालयांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply