
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधापरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यास सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानंतर मतदानाची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावली आहे. जेलमध्ये किंवा कोठडीत असताना मतदान करता येणार नाही असे सुनावणीदरम्यान न्यायलयाने म्हणले आहे. परिणामी देशमुख आणि मलिकांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता न आल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मिळावी यासाठी अनिल देशमुख आणि नवाव मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायलयाच्या या निर्णयाला आव्हान देत दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी दोघांच्या वकिलांनी केली होती. त्यामुळे देशमुख आणि मलिकांना विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मिळते का नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
ज्येष्ठ वकील मीनाक्षी अरोरा यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावतीने न्यायालयात यक्तिवाद केला. पोलिसांच्या सुरक्षेत या दोघांना विधानसभेत मतदानासाठी जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच आमच्या मतामुळे विधानपरिषदेत आम्हाला २ उमेदवारांना निवडून देता येणार आहे. नाहीतर आमचा फक्त एकच उमेदवार विजयी होईल, असा युक्तीवाद देशमुख आणि मलिकांकडून करण्यात आला.
जेलमध्ये असलेल्या व्यक्तीला मतदानाची परवानगी नाही
जेलमध्ये किंवा कोठडीत असताना तुम्हाला मतदान करता येणार नाही युक्तीवादानंतर न्यायलयाने म्हणले होते. जर तुम्हाला मतदान करता येऊ नये यासाठी जर तुरुंगात टाकले तर तो गुन्हा असेल असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. कायद्यानुसार जेलमध्ये असलेल्या व्यक्तीला मतदानाची परवानगी नाही त्यामुळे ही याचिका रद्द करण्यात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

