ठाणे : अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

ठाणे : अंबरनाथमध्ये बांधकाम व्यवसायिकावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कमरुद्दीन खान असं या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे. हल्लेखोरांनी खान यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या असून सुदैवानं त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. ही गंभीर घटना कोहोजगाव मध्ये घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *