बदलत्या जीवनशैलीमुळे अयोग्य आहारपद्धती, अस्वस्थ खाण्या-पिण्याच्या सवयी आणि फास्ट फूडचे जास्त सेवनामुळे अॅसिडिटीची सामान्य समस्या अधिक तीव्र होते. अनेकांना या समस्येचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कारण की डाएटमध्ये असलेली काही अशी फळं आहेत जी आरोग्यदायी मानली जातात परंतु ही फळे ॲसिडिटीची समस्या उद्भवणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. तुम्हालाही ॲसिडिटीची समस्या सतावत असेल तर काही अशी फळं आहेत जी आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. तर आजच्या लेखात आपण अॅसिडिटी झाल्यास कोणती फळांचे सेवन करणे टाळावे आणि का ते जाणून घेऊयात.
1. संत्र
तुम्हाला जर सतत ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर संत्र्यांचे सेवन करणे टाळावेत. जरी ते व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्रोत असले तरी त्यात सायट्रिक ॲसिड असते. संत्री खाल्ल्याने छातीत जळजळ आणि ॲसिड रिफ्लक्स वाढू शकते.
2. लिंबू
तुम्हाला जर ॲसिडिटी होत असेल तर लिंबू खाणे टाळावे. त्यात तीव्र गॅस्ट्रिक ॲसिड असते जे ॲसिडिटी वाढवू शकते, विशेषतः रिकाम्या पोटी सेवन केल्यास.
3. अननस
तुम्हाला जर अॅसिडिटी असेल तर अननस देखील खाणे टाळावे. हेल्थलाइनच्या मते, त्यात सायट्रिक ॲसिड आणि ब्रोमेलेन नावाचे एंजाइम असते, जे पोटातील ॲसिड वाढवू शकते आणि छातीत जळजळ होऊ शकते.
4. कैरी
आयुर्वेदात कैरी खाण्यासही मनाई केले जात आहे. त्यात सायट्रिक, मॅलिक आणि ऑक्सॅलिक ॲसिड असतात, जे पित्त वाढवतात ज्यामुळे छातीत जळजळ आणि आम्लता होते.
5. पेरू
पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यात कडक बिया असतात, ज्या पचायला बराच वेळ लागतो. त्यामुळे कमकुवत पचनसंस्था असलेल्यांसाठी पेरूचे सेवन हानिकारक ठरू शकते. त्यांच्या अपचनक्षमतेमुळे ते आम्लता वाढवू शकतात.
6. द्राक्ष
द्राक्षे हे अँटिऑक्सिडंट्सचा एक उत्तम स्रोत आहेत. त्यांचे सेवन केल्याने पित्त वाढते. त्यात सायट्रिक आणि टार्टेरिक आम्लांचे प्रमाण जास्त असते. हे आम्ल पोटातील आम्ल आणखी वाढवू शकतात, विशेषतः रिकाम्या पोटी सेवन केल्यास छातीत जळजळ होऊ शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


