३ तारखेपर्यंत भोंगे उतरवा अन्यथा..; राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

ठाणे : आज ठाण्यात उत्तर सभेचं आयोजन केलं होतं यावेळच्या सभेतील भाषणात बोलताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भोंग्याचा विषय लावून धरला आहे. ते म्हणाले, 'मी चुकीचं काय बोललो या मशिदीच्या भोंग्याचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक तेढ कुठे आहे? तुम्हाला अजान पडायची आहे , घरात करा. शहरातली रस्ते फुटपाथ कशासाठी अडवता प्रार्थना तुमची आहे, आम्हाला कशाला ऐकवता? सांगून तुम्हाला समजावत नसाल, तर तुमच्या मशिदी बाहेर आम्ही हनुमान चालींसा (Hanuman Chalisa) लावणार म्हणजे लावणार असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.

तसंच आम्ही धार्मिक वातावरण बिघडवत नाही आहोत हा नाही सामाजिक विषय आहे. आमच्या वृद्ध , विद्यार्थी सगळ्यांना त्रास होतो. 5 वेळा बांग देता एकतर सगळे बेसूर असतात. का आम्ही ऐकायचं रस्त्यावर घाण झाली तर आपण रस्ते साफ करतो. मग कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवायलाच पाहिजेत. राज्य सरकारला माझं सांगणे आहे , आंम्ही मागे हटणार नाही, काय करायचं आहे ते करा या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावू ज्या देशात बंदी आहे , तिथे निमूट पणे ऐकत ना माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत। , तेही बोलतात, तुम्ही करताय ते योग्य आहे.

आज तुमचा रमजान सुरू आहे. आम्ही समजू शकतो आमचेही सण असतात , समजू शकतो सणवार असेल तर समजू शकतो. पण 365 दिवस ऐकवतोय, कशासाठी कोणासाठी 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकार, गृह खात्याला विनंती आहे. आम्हाला कुठलाही धार्मीक तेढ निर्माण करायचा नाही, महाराष्ट्राचा स्वास्थ्य आम्हाला बिघडवायच नाही.

पण, आज 12 तारीख आहे, 12 ते 3 मे सगळ्या मशिंदीमध्ये मौलावीनशी बोलून घ्या , भोंगे उतरवायला सांगा 3 तारखेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही. सर्वोच्च न्यालयायाने जर असा निर्णय देत असेल, तर सरकार त्याकडे का दुर्लक्ष करतंय,मतांसाठी का ? असा सवालही त्यांनी सरकारला विसरला



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply