होळीच्या फुग्याने घेतला जीव, विरारमध्ये फुगा मारल्याने अपघातात मृत्यू

देशभरात होळीचा उत्साह आहे. दोन वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात होळी साजरी होत असल्याने सगळीकडे रंगांची मुक्त उधळण सुरू आहे. मात्र विवारमध्ये धुलीवंदनालाच दुर्घटना झाल्याने शोककळा पसरली आहे. होळीच्या दिवशी सकाळी फुगा फोडल्याने एका व्यक्तीचा अपघात झाला. यामध्ये व्यक्तीला प्राणाला मुकावं लागलंय. विरारच्या पश्चिमेकडील आगाशीमध्ये बाईकस्वाराला फुगा लागल्याने दुचाकी आणि सायकलचा अपघात झाला. यात सायकलस्वार जागीच ठार झाला. संबंधित माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी बाईकस्वाराला ताब्यात घेतलं आहे. बूटपॉलिशचं दुकान बंद करून होळीचा सण साजरा करण्यासाठी घरी निघालेल्या रामचंद्र पटेल यांना जीव गमवावा लागला. ते विरारहून चाळपेठच्या दिशेने जात होते. यावेळी काहीजण होळी साजरी करत असताना त्यांच्या दिशेने फुगे आले. यातील एक फुगा विरारच्या दिशेने बाईकवरुन येणाऱ्या मुलांना लागला. अचानक फुगा लागल्याने बाईकस्वारांचं गाडीवरुन संतुलन बिघडलं. नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराचा तोल गेला. यानंतर त्याची बाईक रामचंद्र यांच्या सायकलला धडकली. या दुर्घटनेत रामचंद्र यांचा जागीच मृत्यू झाला.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply