सोलापुरात उद्योग येणार असल्यास रेल्वेची जागा लीजवर देऊ : रेल्वेमंत्री दानवे

सोलापूर : सोलापूरच्या विकासासाठी रोजगाराभिमुख प्रकल्प आणा. रेल्वेची जागा लीजवर देऊ. रेल्वेकडे भरपूर जागा शिल्लक आहे. चांगल्या प्रकल्पासाठी आम्ही रेल्वेकडून जागा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोलापुरातील उद्योजकांना दिले आहे.

रावसाहेब दानवे हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी सायंकाळी त्यांनी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्योजकांशी संवाद साधला. उद्योजकांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. सोलापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्याबद्दल सोलापुरातील उद्योजकांनी मंत्री दानवे यांचे आभार मानले. आभार मानताना वंदे भारतच्या वेळेत बदल करण्याची मागणी त्यांनी केली. मुंबईतून दुपारी सव्वा चारऐवजी सायंकाळी सहा वाजता सोलापूरला सोडा, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. मागणीचे निवेदनदेखील दिले. यावर त्यांनी सकारात्मकता दर्शविली असून, आणखी काही दिवस थांबण्याची विनंती त्यांनी केली आहे.

सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर नेतृत्वाखाली रावसाहेब दानवे यांची सोलापुरात उद्योजकांसोबत बैठक झाली. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आयकॉन स्टीलचे कार्यकारी संचालक दिनेश राठी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, मानद सचिव धवल शहा आदी उपस्थित होते



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply