शरद पवारांच्या घरावरील आंदोलन भोवलं; अ‍ॅड गुणरत्न सदावर्तेंना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या 'सिल्व्हर ओक' येथील निवासस्थानाबाहेर आज एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) अचानकपणे आंदोलन केलं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी 'सिल्व्हर ओक'च्या आवारात घुसखोरी करत आंदोलन केलं. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आज आक्रमक झाल्याचं दिसून आलं. आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' (Silver Oak) या निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचा प्रकार समोर आलाय. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्यानं याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लघंन आणि संघटीत गुन्हेगारी या क्रिमीनल एक्टअतंर्गत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असल्याचे गावदेवी पोलिसांनी सांगीतले आहे.

दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु असल्याचं समजतंय. गावदेवी पोलिसांनी (Gavdevi Police) गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला राहत्या घरातून अटक केलीय. परंतु, पोलिसांकडून FRI ची प्रत दिली जात नसल्याचा आरोप जयश्री सदावर्ते केलाय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply